तुळजापूर (प्रतिनिधी) - तुळजापूर तिर्थक्षेञ  तुळजापूर  शहरासह पंचक्रोषीतील वीस पंचावीस गावांमध्ये राजकिय ताकद असलेल्या युवा नेते विनोद गंगणे यांच्या हजारो समर्थकांनी सोमवार दि.9 सप्टेंबर रोजी शक्ति प्रदर्शन करीत विधानसभा निवडणुक लढवण्या बाबतीत त्यांच्या निवासस्थानी जावुन इच्छापञ देवुन मागणी केली. श्रीगणेश विसर्जन पुर्वी या बाबतीत निर्णय घेण्याचे आश्वासन दिले.

यामुळे तुळजापूर तालुक्यात श्रीगणेश उत्सव काळात तुळजापूर विधानसभा मतदार संघात राजकिय वातावरण चांगलेच ढवळुन निघाले आहे. तालुक्यात  राजकिय भुकंप  होणार  कि नाही हे श्री गणेश विसर्जन पुर्वी स्पष्ट  होणार आहे. युवा नेते विनोद गंगणे विधानसभा निवडणुक लढविण्या बाबतीत काय निर्णय घेणार याकडे राजकिय पक्ष जाणकार, मतदार संघातील मतदारांचे लक्ष लागले आहे.  विनोद गंगणे  समर्थकांनीशा स्वाक्षरी असलेले इछापञसह हजारो समर्थकांनी सोमवार दि 9रोजी ऐकञित येवुन शक्ती प्रदर्शन करीत त्यांच्या जिजामाता नगर येथील निवासस्थानी जावुन  तुम्ही  तुळजापूर विधानसभा  लढवा अशी मागणी इच्छा पञ देवुन केली. या वेळी माजी नगराध्यक्ष  सचिन रोचकरी, नगरसेवक संतोष परमेश्वर, नरेश अमृतराव, इंद्रजित साळुंके, बाळासाहेब भोसले सह समर्थक मोठ्या संखेने उपस्थितीत होते.


 
Top