धाराशिव (प्रतिनिधी)- डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपपरिसरात 76 वा मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यापीठ उपपरिसराचे संचालक प्रा. डॉ. प्रशांत दीक्षित यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. मराठवाडा मुक्तिसंग्राम अमृत महोत्सव समन्वय समितीच्या वतीने 'मराठवाडा मुक्तिसंग्राम अमृत महोत्सव' निमित्त आयोजित विविध स्पर्धेचे प्रमाणपत्र व पारितोषिक वितरण करण्यात आले.  मराठवाडा मुक्तिसंग्राम अमृत महोत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या जिल्हा स्तरीय देशभक्ती गीतगायन स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त केल्याबद्दल कु. प्रगती तुळसीदास शिंदे, शंकरराव जावळे पाटील महाविद्यालय, लोहारा, यांंना विद्यापीठ उपपरिसराचे संचालक प्रा. डॉ. प्रशांत दीक्षित यांच्या हस्ते प्रमाणपत्र व पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच जिल्हा स्तरीय रांगोळी स्पर्धेत तृतीय क्रमांक मिळविल्या बद्दल देशमुख दिव्या दयानंद, रसायनशास्त्र विभाग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपपरिसर, धाराशिव, यांना  विद्यापीठ उपपरिसराचे संचालक प्रा. डॉ. प्रशांत दीक्षित यांच्या हस्ते प्रमाणपत्र व पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.

केशव सीताराम ठाकरे उर्फ प्रबोधनकार ठाकरे जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. विद्यापीठ उपपरिसराचे संचालक प्रा. डॉ. प्रशांत दीक्षित यांच्या हस्ते प्रबोधनकार ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. उपस्थित सर्वांनी प्रतिमेस पुष्प अर्पण केले. यावेळी विद्यार्थी विकास विभाग समन्वयक डॉ. विक्रम शिंदे, मराठवाडा मुक्तिसंग्राम अमृत महोत्सव समन्वय समिती समन्वयक, डॉ. गोविंद कोकणे, विविध विभागातील विभागप्रमुख, प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.

 
Top