तुळजापूर (प्रतिनिधी)- महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी पुनश्च मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विराजमान होवु दे. मुख्यमंत्री होताच तुझ्या चरणी त्यांना घेऊन येईन असे साकडे शिवसेना शिंदे गटाच्या प्रवक्त्या ज्योती वाघमारे यांनी रविवारी राञी श्री तुळजाभवानीला दर्शन घेऊन घातले.
प्रथमता महाराष्ट्राची कुलस्वामीनी श्रीतुळजाभवानी मातेच्या चरणी महाराष्ट्र शाषणाचा विविध योजनांचे पुस्तक देविचरणी अर्पण करुन शिवसेना शिंदे गटच्या प्रवक्त्या ज्योती वाघमारे यांनी रविवारी राञी महाविजय संवाद याञेला प्रारंभ केला. यावेळी शिंदेशाही पुनश्च राज्यात येवु दे, लाडक्या बहीणीला लाभ मिळवुन देणाऱ्या एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी आई म्हणून मागे उभे राहावे. असे साकडे यावेळी श्रीतुळजाभवानी मातेला घातल्याचे सांगितले. यावेळी शहराध्यक्ष बापुसाहेब भोसले, तालुकाध्यक्ष संभाजी पलंगे उपस्थितीत होते.