तुळजापूर (प्रतिनिधी) - माजी मंञी मधुकर चव्हाण यांच्या मंगरुळ येथे रविवार दि. 29 सप्टेंबर रोजी झालेल्या जि. प. गट काँग्रेस कार्यकर्ता संवाद मेळाव्यास मोठा प्रतिसाद लाभला.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती मुकुंदराव डोंगरे, कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी माजी मंत्री मधुकरराव चव्हाण, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सेवा दलाचे माजी अध्यक्ष, विश्वासराव उपासे, पंचायत समितीचे माजी सभापती प्रकाश चव्हाण, शिवाजी गायकवाड बाजार समिती संचालक रामचंद्र ढवळे, अशोक पाटील, ज्येष्ठ कार्यकरते लक्ष्मण दादा सरडे, शहबाझ काझी, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य काशिनाथ बंडगर,दिलीप सोमवंशी, अझहर मुजावर, बालाजी बंडगर, सुरेशभाऊ डोंगरे, रसिक वाले युवा नेते ऋषिकेश मगर,मंगरूळचे सरपंच महेश डोंगरे, उपसरपंच गिरीश डोंगरे, सोसायटी चेअरमन अशोक बचाटे,माजी सरपंच बलभीम डोंगरे,माजी चेअरमन प्रदीप वाले, दिलीप भोकरे, विलास सरडे,महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे महासचिव अभिजीत चव्हाण सुजितहंगरगेकरस प्रा. मोहन कचरे, अमर माने, अशोक शिंदे, अरुण कोळगे, इमाम शेख, रामेश्वर आबा तोडकरी, गौरीशंकर कोडगीरे, मकरंद डोंगरे आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
यावेळी बोलताना चव्हाण म्हणाले की, अणदूर माझी जन्मभूमी असली तरी मंगरुळ ही माझी कर्मभूमी असून, या भागातील लोकांनी मला आजपर्यत प्रचंड सहकार्य केले आहे. हा दुष्काळी भाग होता तो पाणीदार केला. आपण कुणावर टीका, आरोप करणार नाही. मी शेतकरी, दिनदलित, बारा बलुतेदार, गोरगरीबांचा उत्कर्षसाठी काम केले. त्यामुळे माझ्या आयुष्यातील ही शेवटची निवडणूक असुन मी केलेल्या कामांची फक्त दखल घ्या. ग्रामपंचायत प्रमाणे विधानसभा निवडणूक लढवुन काँग्रेसला विजयी करा असे शेवटी आवाहन केले.
यावेळी अध्यक्षायी समोरोप करताना डोंगरे म्हणाले, खादीचे कापड घातले म्हणून कुणी गांधी होत नाही. चव्हाणांचा ताकदीमुळे मी जि. प. सभापती असताना तालुक्याला पन्नास टक्के निधी दिला. या भागात टोपल्यात आंघोळ करण्याची परिस्थिती होती. आता पाणदार केला. रानाला सध्या चिबाड लागतोय अशी परिस्थिती चव्हाण यांनी केले. मराठवाड्यात जेवड्या आमदारांनी काम केले तेवढे काम ऐकट्या चव्हाण यांनी काम केले असे यावेळी म्हणाले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन भैरवनाथ कानडे यांनी केले. यावेळी मंगरुळ जिल्हा परिषद गटातील काँग्रेस कार्यकर्ते, ग्रामस्थ मोठ्या संखेने उपस्थितीत होते.