धाराशिव (प्रतिनिधी)-  येथील रामकृष्ण परमस महाविद्यालयात हिंदी विभागाच्या वतीने 14 सप्टेंबर या हिंदी दिनाच्या निमित्ताने 14 ते 28 सप्टेंबर हा पंधरवाडा वेगवेगळे उपक्रमांनी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयसिंगराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली साजरा करण्यात आला. 

यामध्ये निबंध, वक्तृत्व आणि काव्यवाचन स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेमध्ये प्रथम द्वितीय आणि तृतीय आलेल्या मुलांना प्रमुख पाहुणे यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.मुकुंद गायकवाड यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले. याप्रसंगी हिंदी विभागामार्फत हिंदी साहित्य मंडळासाठी प्रथम द्वितीय आणि तृतीय वर्षांमधून सहा मुलांची निवड करण्यात आली व त्यांचा सत्कार करण्यात आला. 

या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून बोलत असताना डॉ.मुकुंद गायकवाड म्हणाले की, हिंदी ही जगाची संपर्क भाषा म्हणून समोर येत आहे. तिचे भविष्य उज्वल आहे. जगात 148 विद्यापीठांमध्ये हिंदी भाषेचे शिक्षण दिले जाते. हिंदी ही भावनेची भाषा न राहता आता ती व्यापाराची भाषा बनलेली आहे. 

हा हिंदी पंधरवड्याच्या समापनाचा कार्यक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयसिंगराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला. यावेळी हिंदी विभाग प्रमुख डॉ. केशव क्षीरसागर प्रा.राणूबाई कोरे, प्रा. स्वाती देडे इत्यादी हिंदी विभागातील प्राध्यापक आदीसह डॉ. मारुती लोंढे, डॉ. दत्तात्रय साखरे, डॉ. वैशाली बोबडे, प्रा. माधव उगिले आदी प्राध्यापक वृंद व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. कोरे राणूबाई यांनी केले. तर आभार प्रा. देडे स्वाती यांनी मानले.

 
Top