धाराशिव (प्रतिनिधी)- जर्मनीत झालेल्या दुसऱ्या जागतिक डेफ रायफल शुटिंग स्पर्धेत 3 पदकांची कमाई करणाऱ्या चेतन हणमंत सपकाळ ह्या गुणी खेळाडूचा सत्कार रविवार दि. 22 सप्टेंबर 2024 रोजी  करण्यात आला. 

चेतनच्या सत्कार राजगीर बहुद्देशीय सामाजिक संस्थेचे अध्यक्ष नागनाथ गोरसे, सचिव धनंजय वाघमारे, संचालक दिपक सरवदे, संपत शिंदे, प्रकाश सिरसट, राजेंद्र धावारे, भाऊसाहेब झेंडे, सिद्राम वाघमारे, राजगीर बचत गटाचे अध्यक्ष अनुरथ नागटिळक, बन्सी कुचेकर, दादा ठोकळ, आर. टी. गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी चेतनचे वडील प्राध्यापक डॉक्टर हनमंत सपकाळ सर, चेतनच्या मातोश्री सौ सविता सपकाळ मॅडम, पीएसआय सुनील सोनटक्के साहेब, सौ जया गोरसे मॅडम उपस्थित होत्या.

 
Top