भूम (प्रतिनिधी)-  गुढी पाडव्याला उजणी धरणातील पाणी सिना कोळेगाव धरणात आणणार असा विश्वास पालकमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी तालूक्यातील चिंचपूर (बु) येथील गाव संवाद दौऱ्यात शेतकऱ्यांना दिला. 

पालकमंत्री डॉ. सावंत यांनी तालुक्यातील शेळगाव, धोत्री, सक्करवाडी, पांढरेवाडी, लंगोटवाडी, चिंचपूर, ताकमोडवाडी, जेकटेवाडी, देवगाव खुर्द, गोसावीवाडी, कुक्कडगाव, खंडेश्वरवाडी या गावांत संवाद दौरा केला. यावेळी चिंचपूर येथिल मंदीरा समोर सभा मंडप साठी 25 लाख रुपये देण्याची घोषणा सावंत यांनी केली. तसेच विकास कामासाठी निधी कमी पडल्यास स्वखर्चाने विकास कामे करून देणार असल्याची घोषणा केली. पालकमंत्री डॉ. सावंत म्हणाले की उजणीचे पाणी आल्यानंतर तलावा पासुन 5 ते 10 किलोमीटर लांब शेती असलेल्या शेतकऱ्यासाठी उपसा सिंचन समितीची स्थापना करण्याचे धोरण आहे. त्या माध्यमातून पाणी शेतकऱ्यांच्या बांधावर पोचवणार त्यानंतर पुढील पाच वर्षे शेतकऱ्यांचे विज बिल भैरवनाथ कारखाना भरेल अशी घोषणा डॉ. सावंत यांनी केली आहे.

यावेळी जिल्हा समन्वयक गौतम लटके, ॲड सुभाष मोरे, जयदेव गोफणे, डॉ.महेश देवकर, पचायत समीतीचे माजी सदस्य सतिश देवकर, अनिल पाटील, महादेव शिंदे, अजिनाथ देवकर, प्रदिप देवकर, समाधान पाटील, दत्ता सुतार, अशोक कुलकर्णी, गणेश देवकर, यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

 
Top