धाराशिव (प्रतिनिधी)- शहरामध्ये सकल हिंदू समाजाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे राष्ट्रवादीचे नेते शरदचंद्र पवार व थोर पुरोगामी बुद्दी जिवी वर्गाचे वक्ते ज्ञानेश महाराव यांनी प्रभू श्रीराम व श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या बद्दल केलेल्या निंदाजनक वक्तव्याचा व या वक्तव्याला पुष्टी देणारे राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांचा जाहीर निषेध केला.
एका जाहीर कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते शरदचंद्र पवार व कोल्हापुरचे खासदार छत्रपती शाहू यांच्या उपस्थितीत ज्ञानेश महाराव यांनी अतिशय बेताल वक्तव्य केले. महाराष्ट्राचे जाणता राजा म्हणून घेणारे नेते शरद पवार हे यावेळी मूग गिळून गप्प होते. यामधून त्यांची बेगडी प्रतिमा दिसून येते. महाराष्ट्राला थोर संतांचा वारसा असताना देखील अशी वक्तव्य केली जातात हे अतिशय दुर्दैवी आहे.
शहर पोलीस स्टेशन मध्ये ज्ञानेश महाराव यांच्यावर गुन्हा नोंद करण्याची मागणी केली. यावेळी धाराशिव शहर व परिसरातील प्रभु श्री रामचंद्र व श्री स्वामी समर्थ महाराजांचे भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.