धाराशिव (प्रतिनिधी) - महाराष्ट्रातील आंबेडकरी विचारांचे थोर साहित्यीक, कवी प्रा. डॉ. यशवंत मनोहर यांच्या घरासमोरील निषेध करणाऱ्या मनुवादी प्रवृत्तींचा आंबेडकरी समुहाच्यावतीने जाहीर निषेध करुन मनोहर यांना संरक्षण देण्यात यावे, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे राज्यपालांकडे एका निवेदनाद्वारे दि.18 सप्टेंबर रोजी केली आहे.

दिलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, दि. 17 सप्टेंबर रोजी काही अपप्रवृत्तींनी महाराष्ट्रातील आंबेडकरी विचारांचे थोर साहित्यीक, कवी प्रा.डॉ. यशवंत मनोहर यांच्या घरासमोर निषेध करण्याचा प्रयत्न केला. प्रा.डॉ. मनोहर यांना काँग्रेस धार्जीने दाखविण्याचा खोडसळ प्रचार करण्याचा अयशस्वी प्रयत्न काही मनुवादी लोक करीत आहेत. ज्या व्यक्तीने आपली संपूर्ण हयातच आंबेडकरी विचारांची अगदी सखोल मांडणी करण्यासाठी घालविली आहे. तर त्यांनी सातत्याने संविधानीक मुल्यांची जपनूक व्हावी या खास उद्देशाने आपली भूमिका मांडली आहे. विचारवंतांनी आपली भूमिका केवळ पुस्तकांतूनच न मांडता जाहीर देखील केली पाहीजे, तरच खऱ्या अर्थाने त्यांच्या विद्वत्तेचा उपयोग समाजाला पर्यायी देशाच्या अखंडतेला होऊ शकेल. तसेच प्रा. डॉ. मनोहर यांच्या घरासमोर निषेध आंदोलन करणाऱ्या अपप्रवृत्तींच्या विरुध्द आंबेडकरवादी विचारांचे लोक आणखी ताकतीने मनोहर यांच्या पाठीशी ठामपणे उभे असून अशा अपप्रवृत्तींना जाहिर निषेध केला. त्यामुळे त्यांना शासशाने संरक्षण देण्यात यावे, अशी मागणी केली आहे. यावेळी कैलास शिंदे, विशाल शिंगाडे, पृथ्वीराज चिलवंत, रणजीत गायकवाड, दादासाहेब जेटीथोर, अशोक बनसोडे, प्रवीण बनसोडे, व्ही.एस. गायकवाड, संग्राम बनसोडे, अमित बनसोडे,  प्रा डॉ महादेव गायकवाड, प्रमोद हावळे, संदिपान कांबळे, अरविंद वाळके, संग्राम बनसोडे, संदीप बनसोडे, हरिभाऊ बनसोडे, संदीप अंकुशराव, सुनील बनसोडे, दीपक सरवदे, मिलिंद डावरे, विक्रम कांबळे, सुशांत बनसोडे, करण वाघमारे, सोमनाथ गायकवाड, शितल वाघमारे, राजाभाऊ जानराव आदींसह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 
Top