धाराशिव (प्रतिनिधी)- राज्यातील शेतकऱ्यांची पिळवणूक होत आहे, प्रचंड महागाई व बेरोजगारीने जनता त्रस्त आहे. राज्यातील कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न गंभीर बनलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यातही भ्रष्टाचार केला गेला. त्यामुळे शिवरायांच्या पुतळ्याची विटंबना झाली. याला सरकार जबाबदार आहे. या सर्व पार्श्वभूमीवर धाराशिव येथे आज जिल्हा काँग्रेसच्या वतीने केंद्र व राज्य सरकारच्या निषेधार्थ जोडे मारो आंदोलन करण्यात आले.
यावेळी ज्येष्ठ नेते विश्वास शिंदे, जिल्हाध्यक्ष धीरज पाटील, राजाभाऊ शेरखाने, सय्यद खलील, मुकुंद डोंगरे, रामचंद्र आलुरे, प्रकाश चव्हाण, प्रशांत पाटील, अशोक बनसोडे, मेहबूब पटेल, विनोद वीर, अग्निवेश शिंदे, ऋषिकेश मगर, सिद्धार्थ बनसोडे, धनंजय राऊत, उमेश राजेनिंबाळकर, विलास शाळू, रुपेश शेंडगे, हनुमंत वाघमोडे, सुभाष राजोळे, तनुजा हेडा, सुनील बडूरकर, प्रेम सपकाळ, संजय गजधने, सलमान शेख, कफिल सय्यद, स्वप्नील शिंगाडे, धवलसिंह लावंड, सौरभ गायकवाड, गणेश सापते आदी सहभागी झाले होते.