धाराशिव (प्रतिनिधी)-शहरातील गवळी गल्लीतील श्री बाल हनुमान गणेश मंडळ, मानाचा गणपती व धाराशिव चा महाराजा म्हणून गणला गेलेल्या . सामाजिक,अध्यात्मिक ,धार्मिक ,पौराणिक ऐतिहासिक सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या मंडळाच्या कार्यकर्त्यांनी स्वामी विवेकानंद , शारदामाई देवी, रामकृष्ण परमहंस, यांच्या या मंदिराला भेट देऊन लहान, तरुण पिढीने नुकतेच अवलोकन केले. यावेळी रामकृष्ण मिशनचे छत्रपती संभाजी नगर येथील मुनिजी स्वामी राजे अभ्यासपूर्ण विवेकानंदांच्या कार्याविषयी समोर बसलेल्या बालकांना व तरुण पिढीला अत्यंत देशनिष्ठा, देशसेवा ,याविषयी मार्गदर्शन केले.
रामकृष्ण मिशन हे केंद्र राष्ट्रभक्ती,माणुसकी व एकात्मता वाढविण्यासाठी व टीकाविण्यासाठी प्रयत्नशील असणारे केंद्र आहे ,नुकतेच धाराशिव जिल्ह्यामध्ये रामकृष्ण मिशन केंद्र निर्माण केल्यामुळे तरुण पिढीला विविध स्पर्धेच्या परीक्षेसाठी व व्यायामासाठी व विविध क्षेत्रातील अभ्यास करण्यासाठी स्वामी विवेकानंदांचे विचार व कार्य हे भविष्य काळामध्ये उपयुक्त ठरणार आहे. असे मुनी स्वामी राजे यांनी आपल्या उदबोधनातून विचार व्यक्त केले. यावेळी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी नंदकुमार हुच्चे, सागर पाळणे,दुर्गेश दिवटे इत्यादींनी मुनिजींचा मंडळाचा शेला व सन्मान ट्रॉफी देऊन गौरव केला. डॉ.राजमाने अनंत यांचाही मंडळाच्या वतीने सन्मान करण्यात आला. निसर्गरम्य परिसर, ध्यान केंद्र , विवेकानंद अभ्यास केंद्र, इ.आनंदी व प्रसन्नतेच्या वातावरणामध्ये दोन तास मंडळाचे कार्यकर्ते रमून गेले होते. मंडळाच्या गेली साठ वर्षापासून व स्वातंत्र्यपूर्व काळापासून कार्यरत असलेल्या मंडळाच्या कार्याची पार्श्वभूमी फक्त गणेश उत्सव करतो असे नसून समाज प्रबोधन, अध्यात्मिक, ऐतिहासिक, पौराणिक, धार्मिक व सध्याच्या ज्वलंत समस्येवर आधारित मदत साह्य करण्याची मंडळ करीत आहे. जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील कार्यामध्ये जनजागरण, प्रबोधन करीत आहे. मंडळाचे संयोजक भालचंद्र हुुच्चे, मनोज अंजीखाणे, वैभव, युवराज इ.परिश्रम घेत. जिंतूरकर, कुलकणीॅ,साळुंखे,बाबूशा साळुंखे उपस्थित होते.