तुळजापूर (प्रतिनिधी)- तिर्थक्षेञ तुळजापूर विकासासाठी महायुती ने काय केले ते सांगावे, असे प्रतिपादन माजी मंञी मधुकर चव्हाण यांनी बुधवार दि. 11 सप्टेंबर रोजी पञकारांशी संवाद साधताना केले.
माजीमंत्री मधुकर चव्हाण पुढे म्हणाले की, तिर्थक्षेञ तुळजापूरचा विकास करताना स्थानिकांना विश्वासात घेऊन करावा. त्याचे धारावीत रुपांतर होण्यास वेळ लागणार नाही. शहर वाढण्यासाठी विकासासाठी शासकीय कार्यालय वाढले पाहिजेत. शहरात विकास कामे करताना नियोजन बध्द पध्दतीने स्थानिक नागरिकांना विश्वासात घेऊन केले पाहिजे. नाहीतर शहराच्या धारावी होण्यास वेळ लागणार नाही. महायुती काळात शहर व तालुक्यात किती विकास कामे केले. तालुक्याच्या काय विकास झाला हे स्पष्ट सांगावे असे यावेळी म्हणाले.
21 टीएमसी पाणी मी मंजूर करुन आणले ते 7 टीएमसी कसे झाले? असा प्रश्न यावेळी केला. शुक्रवार पेठ भागातील आठवडा बाजार शेजारील पडलेली सुरेखस्मृती इमारत पाडुन तिथे वाहनतळ करा म्हणजे भाविक, स्थानिक रहिवाशांची सोय होणार आहे. तुळजापूर विकास प्राधिकरणातुन याच भागात बांधण्यात आलेल्या 124 खोल्यांची धर्म शाळा खाजगी संस्थेला रुग्णालयासाठी हस्तांतरण करु नये. भाविकांच्या निवासाच्या उद्देशाने बांधली. त्यासाठी त्याचा वापर करावा. घाटशीळ वाहनतळ जवळ नाभीक समाजासाठी मी जागा मिळवून दिली. न्यायालय इमारत मी मंजूर केले. शुक्रवार पेठ भागातील दगडी पायऱ्या व लोखंडी गेट काढण्याची मीच केली होती. मी तालुक्याच्या विकासासाठी राञदिवस काम केले. सध्याचे राजकीय नेते धमकीची व वैयक्तिक टीकात्मक स्वरुपाची व चुकीची भाषा वापरत असल्याची टीका राणे परिवाराचे नाव न घेता केली.