तुळजापूर (प्रतिनिधी)- येथील माजी नगराध्यक्ष सचिन रोचकरी यांच्या महालक्ष्मीगौरी समोर तिरूपती बालाजी मंदीर देखावा मांडला होता. तिरूपती बालाजी मंदीर देखावा पाहिल्यावर लाडुचा प्रसाद दिला जात होता. तिरुपती बालाजी मंदीर देखावा पाहण्यासाठी शहरवासियांची मोठी गर्दी झाली होती. हा देखावा कलाकार मोहन पांढरे, माजी नगराध्यक्ष सचिन रोचकरींची पत्नी पल्लवी, सिध्दनाथ सार्थक यांनी उभारला होता.
या देखाव्याचे उदघाटन बुधवार दि. 11 सप्टेंबर रोजी सकाळी दशावतार मठाचे महंत मावजीबुवा यांच्या हस्ते व युवा नेते विनोद गंगणे, आनंद कंदले , शांताराम पेंदे, पत्रकार संघाचे जिल्हा उपाध्यक्ष श्रीकांत कदम, सहस्थानिक पञकारांच्या उपस्थिती करण्यात आले.