भूम (प्रतिनिधी)-तालुक्यातील मौजे हाडोंग्री येथे गोशाळा भूमिपुजन सोहळा आयोजित करण्यात आला होता.
गणेशोत्सवच्या शुभमुहूर्तावर गोशाळेचे भूमिपूजन डॉ दिपक कदम आयुक्त पशुसंवर्धन विभाग धाराशिव, डॉक्टर यतीन पुजारी, डॉक्टर बाळासाहेब लोंढे, सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन विभाग भूमच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब पाटील हाडोंग्रीकर, अमेय बाळासाहेब पाटील, संजीवनी पाटील, डॉ. प्रदीप दळवी, डॉ. बाबर यांच्यासह पशुपालक सुखदेव पालकर, बिबीशन कदम, शिवहार साखरे, महादेव तळेकर, बब्रुवान साखरे, उमेश साखरे, निलेश टेकाळे, बालाजी रामगुडवे मोठ्या संख्येने उपस्थित होते.