तुळजापूर (प्रतिनिधी)- तुळजापूर शहर पत्रकार संघ व सचिन रोचकरी (माजी नगराध्यक्ष) यांच्या संकल्पनेतून यंदा प्रथमच “ गौरी गणपती आरास स्पर्धा “ आयोजित केल्या आहेत. तरी या स्पर्धेत सहभागी व्हायचे असेल त्यांनी तात्काळ व्हॉटस्अप नंबरवरती आपले नाव, घराचा पत्ता व मोबाईल नंबर देणे आवश्यक आहे. गौरी गणपती आरास स्पर्धेत या निवड समितीच्या वतीने विजेते ठरवण्यात येतील. या स्पर्धा तुळजापूर शहर मर्यादित असेल.
या स्पर्धेसाठी प्रथम बक्षीस 10001 रुपये, द्वितीय बक्षीस 7001 रुपये , तृतीय बक्षीस 5001 रुपये, उत्तेजनार्थ 10 विजेत्यांना स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र असे पुरस्कार ठेवण्यात आले आहेत.
निकालाच्या निर्णयाचे सर्व अधिकार पत्रकार संघास राहतील.ज्यांना या स्पर्धत सहभागी व्हावायाचे आहे त्यांनी स्थानिक पञकारांशी संपर्क साधावा. असे आवाहन आयोजक माजी नगराध्यक्ष सचिन रोचकरी यांनी केले आहे.