परंडा (प्रतिनिधी) - येथील श्री भवानी शिक्षण प्रसारक मंडळ धाराशिव संचलित शिक्षण महर्षी गुरुवर्य रा. गे. शिंदे महाविद्यालय परंडा येथील ग्रंथपाल डॉ.राहुल देशमुख यांना सॉफ्टेक सोल्युशन अँड सर्व्हिसेस पुणे या कंपनीच्या वतीने स्मार्ट लायब्ररीयन पुरस्कार देऊन दिनांक 21 सप्टेंबर रोजी सफायर हॉटेल लोणावळा येथे आयोजित केलेल्या दोन दिवसाच्या कार्यशाळेमध्ये सदर पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
सॉफ्टवेअर सोल्युशनअँड सर्व्हिसेस या संस्थेचे संचालक चेतन टाकसाळे यांनी या कंपनीतर्फे 20 व 21 सप्टेंबर 2024 रोजी कार्यशाळा आयोजित केली होती या कार्यशाळेमध्ये डॉ राहुल देशमुख यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. त्यांना मिळालेल्या या पुरस्कारामुळे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ सुनील जाधव यांच्या हस्ते प्रमाणपत्र व ट्रॉफी देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी उपप्राचार्य डॉ महेश कुमार माने स्टाफ सेक्रेटरी तथा सांस्कृतीक विभाग प्रमुख डॉ. शहाजी चंदनशिवे, प्राणीशास्त्र विभाग प्रमुख डॉ. अतुल हुंबे, प्रा, संतोष भिसे याप्रसंगी उपस्थित होते. त्यांच्या या यशाबद्दल श्री भवानी शिक्षण प्रसारक मंडळ धाराशिव या संस्थेचे सचिव संजय निंबाळकर, अध्यक्ष सुनील शिंदे यांनी अभिनंदन व कौतुक केले.