धाराशिव (प्रतिनिधी)-  येत्या निवडणुकीत तुळजापूर मतदार संघात भाजपच्या उमेदवाराचा पराभव करून महाविकास आघाडीचा उमेदवार निश्चित विजयी होणार असा विश्वास काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष .धीरज पाटील यांनी व्यक्त केला आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने तुळजापूर मतदार संघातील धाराशिव तालुक्यातील 72 गावातील महाविकास आघाडीच्या निष्ठावंत कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. बेंबळी येथे अतिशय उत्साहात पार पडलेल्या या मेळाव्याला हजारो कार्यकर्ते उपस्थित होते.

शिवसेना सहसंपर्क प्रमुख मकरंद उर्फ नंदू राजेनिंबाळकर म्हणाले की, जसे लोकसभा निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार), शिवसेना (ठाकरे) यासह मित्र पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एकजुटीने लढा देत जनता विरोधी भाजपचा पराभव केला. तसेच आगामी विधानसभा निवडणुकीत आपण एकजुटीने काम करून जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदारसंघात विजय मिळवून भाजप व शिंदे गटाला जिल्ह्यातून हद्दपार करू. कार्यकर्त्यांनी एकदिलाने कार्यरत राहावे. येणारा काळ हा आपलाच असेल असा संदेश काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष विश्वासराव शिंदे यांनी बोलताना दिला.

मेळाव्याला राजाभाऊ शेरखाने, प्रशांत पाटील, सतीश सोमाणी, मेहबूब पाशा पटेल, विनोद वीर, अग्निवेश शिंदे,  उमेश राजेनिंबाळकर, बाळासाहेब माने, जीवन बरडे,  मोईन पठाण, आयुब पठाण, सिद्धार्थ बनसोडे, धनंजय राऊत, सत्तार शेख, सलमान शेख उपस्थित होते.

यावेळी तुळजापूर मतदार संघातून निष्ठावंत कार्यकर्त्यांस संधी द्यावी अशा सूर उपस्थित कार्यकर्त्यामधून व्यक्त करण्यात आला. सूत्रसंचालन अग्निवेश शिंदे यांनी केले. तर आभार सत्तार शेख यांनी मानले. बैठकीला ज्येष्ठ नेते अशोकराव पवार,  सयाजीराव देशमुख, अशोक बनसोडे, सुरेंद्र पाटील,  कफिल सय्यद, अमोल कुतवळ, अनिलकुमार लबडे, मेहराज शेख यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

 
Top