भूम (प्रतिनिधी)- 14 वर्षीय वयोगट व 65 किलो वजनी गटात रवींद्र हायस्कूल भूमची मल्ल विद्यार्थिनी ही जिल्ह्यात प्रथम आली. त्याबद्दल तिचा व तिच्या पालकांचा प्रशालेच्यावतीने सत्कार करण्यात आला. या खेळाडूला पुरुषोत्तम डोंबाळे व अमर सुपेकर कबड्डी कोच यांचे मार्गदर्शन लाभले. यांचाही यावेळी प्रशालेच्यावतीने सत्कार करण्यात आला. कुस्ती विजेती आर्या खटाळ हीचे पालक अण्णासाहेब खटाळ यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यात त्यांनी क्रीडा प्रशिक्षक अमर सुपेकर घेत असलेल्या नियमित सरावामुळे त्यांच्या कष्टामुळे व प्रत्येक खेळाडूकडे असलेल्या वैयक्तिक लक्षामुळे आणि शालेय प्रशासनाची क्रीडाविषयक सकारात्मक भूमिकेमुळे हे यश मिळत आहे. असे त्यांनी आपले मत मांडले. यावेळी संस्थेचे सचिव आर.डी.सुळ, मुख्याध्यापक ज्ञानेश्वर गाडे, खेळाडूंचे  उपमुख्याध्यापिका शर्मिला पाटील मॅडम, पर्यवेक्षक मिलिंद लगाडे तसेच धनंजय पवार, भागवत लोकरे तसेच शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी,विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
Top