तुळजापूर (प्रतिनिधी) - महाराष्ट्राची कुलस्वामीनी श्रीतुळजाभवानी दागिने गहाळ प्रकरणी दोषींवर कारवाई होणे गरजेचे आहे. यात राज्य सरकारने अधिकाऱ्यांना वाचविण्याचा प्रयत्न करु नये. मंदीरात भष्ट्राचार, अफरातफर खपवुन घेतली जाणार नाही असा इशारा छञपती संभाजीराजे यांनी श्रीतुळजाभवानी दर्शना नंतर पञकारांशी बोलताना दिला.
यावेळी पञकारांशी मंदीरात संवाद साधताना राजे पुढे म्हणाले कि महाराष्ट्रातील जनतेवर प्रचंड अन्याय होतोय गरीब मराठ्यांना आरक्षण माध्यमातून न्याय मिळणे गरजेचे आहे. आज महाराष्ट्रात शेतकरी कामगारांचे व शिक्षणाचे प्रश्न सोडविण्यासाठी एकञ येणे गरजेचे आहे पण तसे होत नाही. प्रत्येक गोष्टीत राजकारण करण्याचा नवीन पायंडा पडतोय. राजकारणा पलिकडे विचार होणे गरजेचे असल्याचे यावेळी म्हणाले. राजकारणापलीकडे विचार होण्यासाठी तिसरी आघाडी हा पर्याय असल्याचे यावेळी म्हणाले.असुसंस्कृत महाराष्ट्र घडविण्यासाठी ताकद दे असे साकडे देविला घातल्याची माहीती यावेळी दिली.