धाराशिव (प्रतिनिधी)-  शिक्षक दिना निमीत्त 5 सप्टेंबर 2024 रोजी खासदार संपर्क कार्यालय धाराशिव येथे कै. पवनराजे उर्फ भुपालसिंह राजेनिंबाळकर स्मृती गौरव पुरस्कार 2024 चा वितरण सोहळा पार पडला. 

या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून कळंब व धाराशिव मतदार संघाचे आमदार कैलास पाटील व प्रमुख पाहुने म्हणून खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर व माजी धाराशिव न. प. नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर, सिव्हील सर्जन धाराशिव डॉ. नागनाथ धर्माधिकारी उपस्थित होते. पुरस्कार वितरण  शिक्षक नेते बाळकृष्ण तांबारे व शिक्षक नेते विक्रम पाटील यांच्या शुभ हस्ते संजय कोथळीकर, दिलीप मोरे, आश्रुबा कोठावळे, अनिल शिंदे, संगिता पताडे शिक्षकांना पुरस्कार वितरण करण्यात आला. या शिक्षकाच्या पाठीवर थाप देण्यासाठी व पुढील पिढीला उत्कृष्ट पध्दतीने मार्गदर्शन करण्यासाठी असे कार्यक्रम झाले पाहिजेत, असे आमदार कैलास पाटील म्हणाले. या कार्यक्रमाचे नियोजन खासदार कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी केले. कार्यक्रमाचे प्रस्तावित व सुत्रसंचालन गणेश शिंदे यांनी केले.

 
Top