धाराशिव (प्रतिनिधी) - डॉ. बापूजी साळुंखे विधी महाविद्यालय, धाराशिव येथे दिवाणी व फौजदारी प्रकरणाकरीता आवश्यक असलेल्या कायदेशिर दस्ताऐवज विषयक  कार्यशाळा संपन्न झाली. समन्वयक डॉ. स्मिता कोल्हे व सह- समन्वयक प्रा. अजित शिंदे यांनी कार्यशाळेचे यशस्वी आयोजन केले.

प्रसंगी अध्यक्ष म्हणून प्राचार्य डॉ. कायला कृष्ण मूर्ती यांच्या समवेत प्रमूख वक्ते म्हणून ॲड. विशाल साखरे व ॲड. अमोल कुलकर्णी उपस्थित होते. डॉ. स्मिता कोल्हे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. प्राचार्य डॉ. कायाला कृष्ण मूर्ती यांनी डॉ बापूजी साळुंखे विधी महाविद्यालयाची माहिती व कार्यशाळेचे महत्व या विषयी विचार व्यक्त केले. यावेळी ॲड. अमोल कुलकर्णी यांनी दिवाणी न्यायालयातील प्रकरणामध्ये आवश्यक असणारे दस्ताऐवज या विषयी मागदर्शन केले. यामधे सातबारा उतारा, 9:3,9:4 एक्स्ट्रॅक्ट, फेरफार, डिजिटल सातबारा उतारा, प्रॉपर्टी कार्ड, सत्ताप्रकार, गुंठेवारी, अकृषी, लेआऊट, इत्यादी विषयीच्या अनेक महत्त्वपूर्ण दस्ताऐवजांची माहिती दिली.

ॲड. विशाल साखरे यांनी फौजदारी न्यायालयातील प्रकरणामध्ये आवश्यक असलेल्या दस्ताऐवजांविषयी मार्गदर्शन केले. यांत एफ. आय. आर., चार्जशीट, पंचनामा, पुरावे, वैद्यकीय अहवाल, फॉरेन्सिक लॅबचे अहवाल इत्यादी विषयीच्या अनेक महत्त्वपूर्ण दस्ताऐवजांविषयी महिती दिली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. आंचल जानराव यांनी व आभारप्रदर्शन कु. सुशांत मिंधे यांनी केले. प्रसंगी डॉ.नितिन कुंभार, डॉ. पूनम तापडिया, प्रा. कैलाश शिकारे, ग्रंथपाल गायकवाड सर यांच्या समवेत मोठ्या संख्येने विदयार्थी उपस्थित होते. कार्यशाळेची सांगता सामुहिक राष्ट्रगीत गायनाने करण्यात आली.

 
Top