तुळजापूर (प्रतिनिधी)- येथील त्रिशक्ती तरूण मंडळा तर्फे  जेष्ठ सभासद कै. सुजित साळुंके यांच्या निधन पार्श्वभूमीवर मिरवणुकीचा अतिरिक्त खर्च टाळत परिवाराला एक आधार म्हणून त्यांच्या पाश्चात असलेल्या दोन मुलींच्या नावे एक लाख अकरा हजार रुपये  इतकी रक्कम वर्गणी गोळा करुन मुदतठेव पावती माध्यमातून शनिवार दि. 14 सप्टेंबर रोजी महंत वाकोजीबाबा, महंत मावजीनाथ बाबा, महंत व्यंकट अरण्य बाबा, युवा नेते विनोद गंगणे, माजी नगराध्यक्ष सचिन रोचकरी,आनंद कंदले यांच्या हस्ते देण्यात आली.

यावेळी औदुंबर कदम, किशोर साठे,शिरीष कुलकर्णी, किशोर गंगणे, शिवाजी बोधले, अमर हंगरगेकर, शांताराम पेंदे, धैर्यशील दरेकर, श्रीकांत कदम, गुरुनाथ बडुरे, सचिन ताकमोघे त्याचबरोबर त्रिशक्ती तरूण मंडळाचे आधारस्तंभ नरेश अमृतराव, संतोष छत्रे व मंडळाचे सभासद सूरज छत्रे, शितल अमृतराव, शिवाजी हाके, श्रीकांत छत्रे, पिंटू कामे, बालाजी वाघे, सोनू कोळगे, सौदागर पॉळ, नाना अमृतराव, प्रेम पुजारी, महेश पुजारी, बालाजी बेरगळ, अमित छत्रे, आप्पा गायकवाड, शुभम छत्रे, सिद्धिराज कामे, निलेश अमृतराव आदी उपस्थित होते.

 
Top