धाराशिव (प्रतिनिधी)-शहरासह धाराशिव जिल्ह्यात सर्वत्र श्री गणेशाचे उत्साहात आगमन झाले आहे. शनिवारी सकाळपासूनच घरगुती गणपती आणण्यासाठी बालगोपाळासह महिला व पुरूषांनी मुख्य बाजारपेठ, चौक ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. 

शहरासह जिल्ह्यात 1100 गणेश मंडळे असल्याचे सांगण्यात आले. या मंडळांनी श्री गणेशाची स्थापना दुपारनंतर केली आहे. धाराशिव शहरातील गवळी गल्लीतील बाल हनुमान गणेश मंडळाने दरवर्षीप्रमाणे पालखीमध्ये श्री गणेशाची मुर्ती ठेवून लेझीम पथकासह सायंकाळी मिरवणूक काढली. अनेक गणेश मंडळांनी ढोल पथक, झांज पथक आदी पारंपारिक वाद्यासह मिरवणुका काढून श्री गणेशाची स्थापना केली. 


जिल्ह्यात 500 कारखाने 

धाराशिव शहरासह जिल्ह्यात श्री गणेशाची मुर्ती बनविण्याचे कारखाने 500 असल्याचे मुर्तीकार बालाजी डोंगे यांनी बोलताना सांगितले. धाराशिव शहरात 80 च्या जवळपास श्री गणेशाची मुर्ती तयार करण्याचे कारखाने आहेत. जिल्ह्यातील श्री गणेशाच्या मुर्ती आंध्रप्रदेश, कर्नाटक, तेलंगना या तीन राज्यात जातात. श्री गणेशाच्या मुर्तीची किमंत 50 रूपयापासून 25 हजार रूपयापर्यंत असल्याचे डोंगे यांनी सांगितले. 

 
Top