भूम (प्रतिनिधी)- जवळा (नि.) ता.परांडा येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र राज्याचे सरचिटणीस डॉ.प्रतापसिंह पाटील यांच्या वतीने 'जागर आरोग्याचा' या संकल्पनेतून जवळा गाव व परिसरातील जवळपास 900 गरजू नागरिकांनी आयोजित केलेल्या आरोग्य शिबिराचा लाभ घेतला. यामध्ये मोफत डोळे तपासणी,गरजूंना मोफत चष्मे वाटप,औषधे उपचार तसेच फिजियोथेरपी अंतर्गत सर्व आजाराचे निवारण या आरोग्य शिबिरामध्ये करण्यात आले.

यावेळी डॉ.प्रतापसिंह पाटील, हनुमंत तात्या कातुरे,अशोक गवारे,कुंडलिक गवारे .बालाजी गवारे, ज्ञानेश्वर गवारे ,अश्रू कातुरे, दादासाहेब गवारे, अक्षय गवारे, शंकर टारकर ,सुरज गवारे ,ज्ञानेश्वर गवारे तसेच जवळा पंचक्रोशीतील नागरिक व इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
Top