तुळजापूर (प्रतिनिधी)- येथील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित तुळजाभवानी महाविद्यालय तुळजापूर येथे मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ जीवन पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले.
तसेच सदर प्रसंगी सुप्रसिद्ध व्याख्याते प्रा अर्जुन जाधव यांचे राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले, यावेळी त्यांनी मराठवाडा मुक्तीसंग्राम या विषयाचा प्रभावशाली इतिहास उपस्थितांसमोर मांडला.ध्वजारोहणाप्रसंगी एन.सी.सी चे सुंदर पथसंचलन पार पडले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा धनंजय लोंढे,प्रा विवेक कोरे,प्रा जे.बी.क्षीरसागर,प्रा आलोक शिंदे ,प्रा डॉ.नेताजी काळे,यांचे उत्तम सहकार्य लाभले.तसेच यावेळी शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य दोंड , मुख्याध्यापक यलगुंडे ,माजी प्राध्यापक जगदाळे यांची प्रमुख उपस्थिती होती.व्याख्यानाप्रसंगी प्राचार्य डॉ जीवन पवार यांनी प्रास्ताविक केले तर वरिष्ठ विभागाचे राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी प्रा.विवेकानंद चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले व कनिष्ठ विभागातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग प्रमुख प्रा अनिल नवत्रे यांनी आभार मानले.सदर प्रसंगी महाविद्यालयाचे सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनी तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.त्याचप्रमाणे मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाचे औचित्य साधून यावेळी स्वच्छ भारत अभियानाचे सामुहिक शपथवाचन देखील घेण्यात आले.