धाराशिव (प्रतिनिधी)-मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनी मुक्तिसंग्रामाच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने संपूर्ण वर्षभर त्या अनुषंगाने राबविलेले विविध उपक्रम व या मुक्तिसंग्रामातील स्वातंत्र्यसेनानींनी केलेले अतुलनीय कार्य 'मराठवाडा नव्हे,भारत मुक्तिसंग्राम' या ग्रंथाच्या माध्यमातून लिहून ते प्रशासनाच्या वतीने प्रकाशित करून मुक्तिसंग्रामातील प्रसंग व आठवणी कायमच्या जतन करून स्वातंत्र्यसेनानी व त्यांच्या वारसांचा यथोचित सन्मान केल्याबद्दल जिल्हा स्वातंत्र्यसैनिक वारस समिती धाराशिवच्या वतीने युवराज नळे यांना पालकमंत्री नामदार तानाजीराव सावंत यांच्या हस्ते 'कृतज्ञता सन्मान पुरस्कार' देऊन सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी आमदार ज्ञानराज चौगुले जिल्हाधिकारी डॉ सचिन ओंबासे जिल्हा पोलीस अधीक्षक संजय जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.
स्वतंत्र सेनानी व त्यांच्या वारसांनी पुरस्कार देऊन माझा व माझ्यासोबत काम करणाऱ्या सर्व सहकाऱ्यांचा सन्मान केला आहे. हा सन्मान खऱ्या अर्थाने सेवा व निरपेक्ष वृत्तीने केलेल्या कार्याचा सन्मान असून स्वातंत्र्यासाठी रक्त सांडलेल्या रणझुंजार युद्ध्यांनी ही माझ्या पाठीवर टाकलेली शाबासकीची थाप मला यापुढेही जबाबदारीने अविरत सेवा करण्यासाठी नितांत ऊर्जादायी ठरेल असे प्रतिपादन युवराज नळे यांनी केले. याप्रसंगी स्वातंत्र सेनानी भास्करराव नायगावकर, बुबासाहेब जाधव, शेषराज बनसोडे, प्रभाकर चोराखळीकर, संतोष शिवाजीराव नलावडे, प्रकाश भगवान तोडकरी, बाळासाहेब टापरे, उमाजी देशमुख, भागवत शिंदे, राहुल संभाजी देशमुख, अभिमान हंगरगेकर, हनुमंत पडवळ, ॲड बोंदर, ॲड अजय वाघाळे, शेषनाथ वाघ, गणेश वाघमारे, लक्ष्मण माने हे स्वातंत्र सैनिक वारस समितीचे पदाधिकारी व स्वातंत्र्यप्रेमी उपस्थित होते.