भूम (प्रतिनिधी)- महाराष्ट्रात सुरू केलेल्या लोककल्याणकारी योजना सातत्याने पुढे चालू राहतील. कुठलीही योजना बंद पडणार नाही. लाभधारकच पुन्हा एकदा याच सरकारला नेतृत्वाची संधी निश्चितपणे देतील. कार्यकर्त्यांनी योजना घरापर्यंत पोहोचवण्यासाठी मेहनत घ्यावी. असे आवाहन करत पुन्हा एकदा महाराष्ट्रात भाजप - सेना - राष्ट्रवादीचे सरकार येईल. असे मत आमदार डॉ. अविनाश जाधव यांनी भूम येथील बैठकीत बोलताना व्यक्त केले.
रविवार दि. 29 सप्टेंबर 2024 रोजी आगामी विधानसभा निवडणुकीच्या संदर्भात परंडा विधानसभा मतदार संघाच्या प्रवाशी पदाची जबाबदारी असलेले कर्नाटक विधानसभा चिंचोली मतदार संघाचे आमदार डॉ. अविनाश जाधव यांनी भूम- परंडा- वाशी तालुक्यातील मोजक्या कार्यकर्त्यांची बैठक घेऊन महत्वपूर्ण संकेत दिले. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्रात भाजप - शिवसेना - राष्ट्रवादीचे सरकार येईल असा विश्वास व्यक्त केला.
यावेळी परंडा विधानसभा मतदारसंघाचे भाजप अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, विकास कुलकर्णी, अंगद मुरूमकर, सुदाम पाटील, महादेव आखाडे, सुखदेव टोम्पे, महादेव वडेकर, संतोष सुपेकर, बाबासाहेब वीर, राजगुरू कुकडे महाराज, सुधीर घोलप, गणेश खरसडे, धनाजी गायकवाड, शंकर खामकर, प्रदीप साठे, हेमंत देशमुख आदींची उपस्थिती होती.