परंडा (प्रतिनिधी)-तालुक्यातील शेतकऱ्यांचे उत्पादित केलेल्या उडीद, मुग, मका व इतर धान्य परंडा येथील व्यापाऱ्यांकडे आणले असता कोणताही व्यापारी शासनाचा हमी भाव देत नाही. उलट कमी दराने माल खरेदी करून शेतकऱ्यांना वेठीस धरून फसवणूक करत आहे. याबाबतचे निवेदन परंडा तहसीलदार यांना देउन उडिद, मुग, मका व इतर धान्याला शासनाच्या हमी भावाने खरेदी करून शेतकऱ्यांची पिळवणूक थांबवावी अशी मागणी केली.

यावेळी भाजपा जिल्हा सरचिटणीस विकास कुलकर्णी, तालुकाध्यक्ष ॲड.गणेश खरसडे, शहर उपाध्यक्ष धनंजय काळे, मनोहर पवार, गौरव पाटील, परसराम कोळी, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष अरविंद रगडे, अजित काकडे, साहेबराव पाडुळे, बाळासाहेब गिरी, कांतीलाल पाटील, सारंग घोगरे, गजानन तिवारी राहुल बनसोडे, बाळासाहेब वाघ तसेच इतर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
Top