धाराशिव (प्रतिनिधी)- येथील तेरणा अभियांत्रिकीच्या इलेक्ट्रॉनिक्स व टेली कम्युनिकेशन विभागामध्ये 'अभियंता दिन' तांत्रिकतेचे प्रदर्शन करून  उत्साहात साजरा करण्यात आला.

दर वर्षी 15 सप्टेंबर हा दिवस श्री.एम.विश्वेश्वरय्या यांच्या जयंती दिवशी साजरा करण्यात येतो. यावेळी ई टी सी विभागातील विद्यार्थ्यांसाठी प्रोजेक्ट प्रदर्शन आणि पोस्टर प्रेजेंटेशन या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांनी त्यांची कल्पनाशक्ती वापरून विविध प्रोजेक्ट्स आणि पोस्टर्स बनवले आणि सर्वांची वाहवा मिळवली. या स्पर्धांचे उदघाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.विक्रमसिंह माने यांच्या हस्ते करण्यात आले.या प्रसंगी सर्व विभाग प्रमुख आणि विभागातील सर्व स्टाफ उपस्थित होते. प्रदर्शनात मांडलेल्या प्रोजेक्ट्सचे आणि पोस्टर्सचे डॉ.माने यांनी खूप कौतुक केले.यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले की अश्या स्पर्धा यापुढेही होत राहतील यातील काही निवडक विद्यार्थ्यांचे प्रोजेक्ट स्मार्ट इंडिया हेकाथॉन,अविष्कार, जागतिक कौशल्य स्पर्धा, डिफेक्ट, महाराष्ट्रीयन चॅलेंज यामध्ये प्रदर्शित करण्यासाठी सर्वतोपरी कॉलेज मदत करेल त्यामुळे सर्वांनी यात भाग घेऊन आपले ज्ञान वाढवण्याचा प्रयत्न करावा.

ई टी सी विभाग प्रमुख डॉ.प्रशांत कोल्हे यांनी भाग घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले.भविष्यात असेच आणि याहूनही सरस असे प्रोजेक्ट्स विद्यार्थ्यांनी करावेत असे मत त्यांनी या प्रसंगी व्यक्त केले. या स्पर्धेमध्ये भाग घेतलेल्या प्रोजेक्ट्स आणि पोस्टर्स मधून प्रथम आणि द्वितीय क्रमांकाचे बक्षीस देण्यात आले.यावेळी माननीय प्राचार्यांच्या हस्ते या विद्यार्थ्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. हा दिन साजरा करण्यासाठी आणि स्पर्धा यशस्वी करण्यासाठी विभाग प्रमुख डॉ.प्रशांत कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा.श्रीकांत अघोर आणि प्रा.वर्षा बोन्दर यांनी काम पाहिले.विभागातील सर्व कर्मचाऱ्यांनीही हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्वतोपरी परिश्रम घेतले.यावेळी माननीय प्राचार्यांच्या हस्ते प्रा.श्रीकांत अघोर आणि प्रा.वर्षा बोन्दर यांचा सत्कार करण्यात आला.

 
Top