वाशी (प्रतिनिधी)- मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवली सराटी येथे मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे यासाठी सहाव्यांदा आमरण उपोषणाला बसले आहेत. त्यांच्या उपोषणाचा पाचवा दिवस आहे. या उपोषणाला समर्थन देण्यासाठी धाराशिव जिल्ह्यात शनिवारी(दि. 21) सप्टेंबर रोजी बंदची हाक देण्यात आली होती.
त्या हाकेला पाठिंबा म्हणून वाशी शहरातील अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बाजारपेठ,शाळा, महाविद्यालय बंद होते. त्यामुळे शहरात मोक्याच्या ठिकाणी असलेल्या बाजारपेठेसह सर्वत्र शुकशुकाट दिसून आला.