धाराशिव (प्रतिनिधी)- येथील भागिरथी परिवार यांच्या गणेश उत्सव मंडळाच्या वतीने शहरातील आशा वर्करांचा सन्मान आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाच्या सरचिटणीस प्रेमाताई पाटील यांनी केला.
प्रथम प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेल्या सर्व आशा वर्करांच्या व सरचिटणीस प्रेमाताई सुधीर पाटील यांच्या हस्ते 'श्री ' च्या मूर्तीची पूजा व आरती संपन्न झाली.
निमित्त होते गणेशोत्सव निमित्त झालेल्या आयोजित समाजपयोगी कार्य करणाऱ्या लोकांचा सत्कार सोहळ्याचे - प्रत्येक वर्षी सातत्याने भागिरथी परिवाराच्या वतीने असे कार्यक्रम आयोजित करण्यात येतात - या वर्षीही कोरोना काळात आपला जीव धोक्यात घालून आरोग्य सेवा देणाऱ्या व इतर अनेक प्रकारच्या सेवा देणाऱ्या आरोग्य दूत असलेल्या आशा स्वयंसेविका श्रीमती अलका जाधव, रुक्सार शेख, रेखा बनसोडे, सुषमा पाटील, कोमल गंगावणे, अनुराधा शिंदे, रहिमुन्निसा शेख, आशा बिडबाग, फातेमा सय्यद, समिना सय्यद, मिनाक्षी सरवदे, वैशाली भिसे, शुभांगी क्षीरसागर, ज्ञानेश्वरी घोडके, पुजा सुर्यवंशी, सीमा पाटील यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी भागिरथी परिवाराचे संस्थापक युवा उदयोजक अभिराम पाटील व मंडळाचे अध्यक्ष व कार्यकर्ते तसेच के. टी. पाटील फॉर्मसी कॉलेजचे प्राचार्य अमोल जोशी, श्रीमती गीता सपकाळ, शोभा टोले, चित्रा हंगरकेकर, धनश्री देसाई, रुबीया काझी, संगीता मुंडे व उज्ज्वला पाटील व उमाजी पायाळ उपस्थित होते.