कळंब (प्रतिनिधी)-येथील साईनगर हाऊसिंग को-ऑपरेटिव्ह सोसायटीची सर्वसाधारण सभा दि. 29 सप्टेंबर रोजी कार्यालयात आयोजित करण्यात आली होती. या सर्वसाधारण सभेचे अध्यक्ष म्हणून बळीराम ढवळे हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून व्यासपीठावर साई नगर हाऊसिंग को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे मुख्य प्रवर्तक संजय देवडा, भागवत मोरे, लेखापरीक्षक संतोष देवकर हे यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.
यावेळी कार्यक्रमात दिवंगत झालेले कै. डॉ. हनुंमत गव्हाणे, कै. नागरबाई ढवळे यांना यावेळी आदरांजली वाहण्यात आली. यावेळी सोसायटी मार्फत सुरक्षा रक्षक मारुती लोकरे यांचा सोसायटीमार्फत सन्मान करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाची प्रस्तावना सोसायटीचे सचिव विलास मुळीक यांनी केली. सर्वसाधारण सभेत अनेक विषयावर चर्चा करण्यात आली. या सर्वसाधारण सभेसाठी उद्धव गीते, चंद्रकांत दशवंत, नामदेव सुतार, प्रशांत कोल्हे, यशवंत हरकर, भागवत मोरे, सचिन एरंडे, बापूसाहेब चव्हाण, आमोल वाघचौरे, गणेश डोंगरे, माणिकराव लांडगे, प्रकाश टोणगे, शामराव कोयले, किशोर शिंदे, रवींद्र हरकर, कुलकर्णी, सूर्यकांत वाघमारे, आमोल वाघचौरे आदी उपस्थित होते. तर या सभेसाठी मारुती लोकरे सह आदींनी परिश्रम घेतले. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचलन नानासाहेब कवडे यांनी केले. तर कार्यक्रमाचे आभार तुकाराम गरुडे यांनी मानले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.