धाराशिव (प्रतिनिधी)-  धाराशिव शहरातील जिल्हा क्रीडा संकुलाच्या विकास कामासाठी 28 कोटी रुपये निधी द्यावा. अशी मागणी छत्रपती संभाजीनगर विभाग शिक्षक मतदारसंघाचे आमदार विक्रम वसंतराव काळे यांनी क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांच्याकडेे केली आहे.

धाराशिव ही खेळाडू घडवणारी भूमी आहे. धाराशिव जिल्ह्यातून दरवर्षी मोठ्या संख्येने राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळी पर्यंत खेळाडू नेत्र दीपक यश संपादन करत आहेत. धाराशिव शहरात मध्यवर्ती ठिकाणी जिल्हा क्रीडा संकुल आहे. या ठिकाणी सिंथेटिक धावनपथ, जलतरण तलाव तसेच विविध अनुषंगिक कामासाठी निधी द्यावा. अशी मागणी आमदार विक्रम काळे यांनी केलेली आहे.

यापूर्वी संचालक, क्रीडा व युवक कल्याण सेवा संचनालय पुणे यांच्यामार्फत संदर्भीय आदेशान्वयेये 28 कोटी रुपयेच्या खर्चास प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली आहे. सदर प्रशासकीय मान्यतेनुसार धाराशिव जिल्हा क्रीडा संकुलाच्या विविध विकास कामासाठी निधी मंजूर करून द्यावा. अशी मागणी क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांच्याकडे केलेली आहे. 


यापूर्वी किती खर्च झाला

धाराशिव शहरातील तुळजाभवानी क्रिडा संकूल हे जिल्हाधिकारी यांच्या अंतर्गत येते. क्रिडा संकुलांमधील जलतरण तलाव, संकुलामधील मैदान, माती काढणे, माती टाकणे यावर किती खर्च झाला. या संदर्भात माहिती घेतली असता 1 कोटी रूपयांच्यावर आतापर्यंत खर्च झाला असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे तुळजाभवानी क्रिडा संकुल विकासकामासाठी 28 कोटी रूपये निधीची मागणी केली असली तरी हा खर्च नियोजनबध्द पध्दतीने व चांगल्या दर्जाच्या कामासाठी याचा वापर होवा, अशी मागणी केली जात आहे. 

 
Top