तेर (प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यातील तेर येथील विद्युत वितरण कंपनीच्या उपविभागीय कार्यालयांतर्गत बदली झालेल्या व नव्याने रूजू झालेल्या कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आला.
यंत्र चालक शशिकांत पांढरे,विंदू जाधव, सतिश पवार वरीष्ठ तंत्रज्ञ शरद मेंगले, बाळासाहेब लगट, अशोक भोरे, विवेक पाटील यांची इतरत्र बदली झाली आहे तर नव्याने वरीष्ठ तंत्रज्ञ हरीभाऊ कुंभार, बाबुराव माने, तंत्रज्ञ विठ्ठल पवार रूजू झाले याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रभारी उपविभागीय कार्यकारी अभियंता अमोल कोळे तर प्रमुख पाहुणे म्हणून सहाय्यक अभियंता सतीश पवार व शरद शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.