धाराशिव (प्रतिनिधी) - धनगर समाजास एस.टी. जातीचे प्रमाणपत्र देण्यात यावे या मागणीसाठी ओबीसी बहुजन पार्टीच्यावतीने धाराशिव तालुक्यातील तेर ढोकी रस्त्यावर मेंढरे घेऊन दि.23 सप्टेंबर रोजी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

धनगर समाजास एसटी जातीच्या प्रवर्गाचे प्रमाणपत्र तात्काळ देण्यात यावे या मागणीसाठी संपूर्ण राज्यभरात धनगर समाजाच्यावतीने आंदोलन करण्यात येत आहे. त्याचाच भाग म्हणून धाराशिव तालुक्यातील तेर येथे ढोकी रोडवर धनगर बांधवांनी रस्त्यावर मेंढरे आणून रस्ता रोको आंदोलन केले. त्यामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. या आंदोलनामध्ये ओबीसी बहुजन पार्टीचे जिल्हाध्यक्ष तथा अहिल्यादेवी स्मारक समितीचे अध्यक्ष सचिन शेंडगे, सोमनाथ धायगुडे, जांगनाथ देवकाते, इंद्रजीत कोळपे, गोरोबा पडूले, प्रभाकर घटुळे, रणधीर सलगर, अनिल टेळे, विनायक टेळे, अमोल खांडेकर, रमाकांत लकडे, सचिन देवकते, महादेव थोरात, सचिन पांढरे, सक्षणा सलगर, नवनाथ पसारे, नाना भक्ते, हरि भक्ते, राजेंद्र पासरे, गोपाळ लकडे, शामा गायके, विलास मदणे, बंजरंग कर्णवर, राजेंद्र कानडे, दता गायके आदी सहभागी झाले होते.


 
Top