धाराशिव (प्रतिनिधी) - येथील पद्मावती महिला नागरी सहकारी पतसंस्थेची पहिली वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात दि.29 सप्टेंबर रोजी पार पडली. या बैठकीत चेअरमन शकुंतला देवकते यांनी सभासदांना ठेवीच्या प्रमाणात 6 टक्के लाभांशाचे वाटप करण्यात येणार असल्याची घोषणा केली.

धाराशिव येथील मेघ मल्हार हॉटेलमध्ये या सभेचे आयोजन करण्यात आले होते. सभेच्या अध्यक्षस्थानी बँकेच्या चेअरमन शकुंतला देवकते तर प्रमुख पाहुणे म्हणून नारायणदास भन्साळी, बँकेच्या उपाध्यक्षा रिमा नवगिरे, संचालिका गंगोत्री कुऱ्हाडे व सुनिता देवकते आदी उपस्थित होते. या बँकेचे 731 आहेत. तर एकूण भाग भांडवल 7 लाख 68 हजार 600 रुपये व गंगाजळी 7 हजार 210 रुपये असून इमारत निधी 57 हजार रुपये आहे. तर ठेवी 99 लाख 32 हजार 399 रुपये आहेत. तर कर्ज 70 लाख 46 हजार 843 रुपयांचे वाटप करण्यात आले आहे. 2023- 24 या आर्थिक वर्षातील अहवालाचे वाचन रिमा नवगिरे यांनी केले. यावेळी नारायणदास भन्साळी, सुरेंद्र पाटील, वागतकर यांनी मार्गदर्शन केले. या बैठकीचे प्रस्ताविक व सूत्रसंचालन बँकेचे मार्गदर्शक दीपक देवकते यांनी व उपस्थितांचे आभार अमित देवकते यांनी मानले. या बैठकीस बँकेचे सर्व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 
Top