तुळजापूर (प्रतिनिधी) - तुळजापूर खुर्द भागातील जय शिवाजी तरुण मंडळ महात्मा फुले युवा मंच तुळजापूर खुर्द यांच्या वतीने गणेशोत्सव निमित्त घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात 31 गणेश भक्तांनी रक्तदान केले.
प्रारंभी या शिबीराचे उदघाटन पोलीस निरीक्षक रविंद्र खांडेकर यांच्या हस्ते श्रीची आरती करुन करण्यात आले. यावेळी धाराशिव जिल्हा मजूर फेडरेशन चेअरमन नारायण नन्नवरे,जिल्हा धैर्यशील कापसे, गणेश नन्नवरे अजिंक्य नन्नवरे बालाजी जाधव महेश चव्हाण विजय नन्नवरे अजय गायकवाड विश्वास भोजने आदी उपस्थित होते. या शिबिर यशस्वीतेसाठी मंडळाचे अध्यक्ष चैतन्य क्षीरसागर, उपाध्यक्ष आकाश घाटोळे, माऊली भोजने, पांडुरंग खारे, चंद्रसेन भोजने, अमर माळी, संतोष भोजने आदींनी परिश्रम घेतले. मल्लिकार्जुन ब्लड बँक यांचे सहकार्याने शिबिर घेण्यात आले.