उमरगा (प्रतिनिधी)-  आंबेडकरी चळवळ केंव्हाच संपुष्टात येणार नाही. या चळवळीला त्यागाची बलिदानाची परंपरा आहे. चळवळी समोर अनेक अडचणी आहेत. चळवळीने मला काय दिले या पेक्षा आपण चळवळीला काय देतो ही मानसिकता जोपासून काम केल्यास डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीस चांगले दिवस येतील. आज रस्त्यावरच्या आंदोलना पेक्षा आर्थिक, शैक्षणिक, आणि धार्मिक क्रांतीतून नवसमाजाची निर्मिती करण्यासाठी समाजातील सक्षम वर्गानी समोर येणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन माजी प्राचार्य डॉ. श्रीकांत गायकवाड यांनी केले.

शहरातील कैलास शिंदे मंगल कार्यालयात मंगळवारी बोधिसत्व बचत गटाच्या वतीने समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कार्यकर्त्यांचा समाजरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. या वेळी अध्यक्ष स्थानावरून गायकवाड बोलत होते.कार्यक्रमास जिल्हा बँकेचे माजी उपाध्यक्ष कैलास शिंदे, लॉर्ड बुद्धाचें उपाध्यक्ष एम.एस.सरपे, एस.के.कांबळे चेले,हरिष डावरे,रामभाऊ गायकवाड अडँ मल्हारी बनसोंडे,अडँ हिराजी पांढरे, दिग्विजय शिंदे,समीर सुतके,नीलकंठ कांबळे आदींची उपस्थिती होती.

यावेळी बचत गटाचे अध्यक्ष सुभाष काळे यांनी गट स्थापने पासून सामाजिक बांधिलकी जपत कार्य करीत असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राहुल कांबळे यांनी केले बालाजी गायकवाड यांनी आभार मानले. यावेळी प्रा.नागनाथ गायकवाड, प्रा.हिरालाल गायकवाड,प्रा संतोष सुरवसे,प्रा.संजीव कांबळे,दत्ता सोनकांबळे, बालाजी सुरवसे,तानाजी कांबळे,बाबा जाधव,राहुल सरपे,दयानंद बेळंबकर,मनोज कांबळे आदींनी कार्यक्रमास परिश्रम घेतले.

 
Top