तुळजापूर (प्रतिनिधी)-  तिर्थक्षेञ तुळजापूर येथील बस आगारातील गाड्या या भंगार  झाल्या असून, तसेच  गाडीतील  स्वछते बाबतीत  दुर्लक्ष असल्याने अशा गाड्या प्रवाशांच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरण्याची शक्यता आहे.

तिर्थक्षेत्र तुळजापूर बस आगारातील बसेस या  महाराष्ट्रात सर्वत्र जातात. सध्या आतुन बाहेरुन गाड्यांची  प्रचंड दुरावस्था झाली आहे. गाडीत टायर अस्तव्यस्त पडले आहेत. तसेच प्रवाशी सीट फाटलेले तर आहेत जे काही चांगले आहेत त्यावरही प्रचंड धुळीचे थर साचलेले दिसत आहे. गाडी प्रवाशांच्या सेवेत  आणताना साधे सीटची स्वच्छता न करता प्रवाशांच्या सेवेत आणल्या जात आहेत. प्रवाशी बसमध्ये  प्रवेश करताच सर्वत्र घाणच घाण दिसत असल्याने सीट वर न बसता प्रवासी तोंडाला रुमल बांधुन उभ्याने प्रवास करीत आहेत. तर काही प्रवासी स्वतःजवळील कपड्याने स्वताःच सीटवरील घाण काढुन तिथे बसुन प्रवास करीत आहेत.

सध्या महिला, विद्यार्थीनी, अपंग, जेष्ट नागरिक, खेळाडू यांना एस. टी. प्रवाशांना दरात सवलत आहेत. यात सवलत द्यायची आणी तिकडे गाड्या भंगार, अस्वच्छ उपलब्ध करुन द्यायच्या. या प्रकाराबद्दल महिला प्रवाशी वर्गातुन नाराजी व्यक्त केली जात. सध्या अशा गाड्यातुन प्रवास करणे धोकादायक व आरोग्यशी निगडीत समस्या अंगी घेणे असा प्रकार आहे.

तुळजापूर तिर्थक्षेञ हे महाराष्ट्रातील साडेतीन शक्ती पीठापैकी एक धार्मिक शक्तिपीठ आहे. अशा पविञ ठिकाणी भंगार, अस्वछ एस. टी. बस आगाराला देणे म्हणजे एसटी महामंडळाचे लक्तरे जनते समोर आणने आहे. तर तिर्थक्षेत्राचा विचार करता येथे चांगल्या गाड्या देवुन एसटीतील स्वच्छते बाबतीत लक्ष घालण्याची मागणी होत आहे.


तिर्थक्षेञी अशा  भंगार, अस्वच्छ  एसटी मुळे राज्यात नव्हे तर देशात काय संदेश जाईल. हा प्रकार प्रवाशांच्या आरोग्याशी खेळल्या सारख आहे. अशी प्रतिक्रिया त्याच एसटीतुन प्रवास करणारे धनाजी कुरुंद यांनी दिली.

 
Top