धाराशिव (प्रतिनिधी)- भारतीय संविधान अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त मतदार जनजागरण समितीच्या वतीने भारतीय संविधान जनजागरण करण्यात येत असुन महिन्याच्या पहिल्या 26 तारखेला समितीच्या वतीने व्याख्यान, वाचन व इतर कार्यक्रम घेतले जातात. शहरातील वेगवेगळ्या नर्सिंग कॉलेजमध्ये व्याख्यान घेतले जात असुन सध्या नर्सिंग कॉलेज मध्ये परिक्षा चालु असल्याने विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या समोरील भारतीय संविधान उद्देशिका स्मारकासमोर भारतीय संविधान उद्देशिकाचे सामुदायिक वाचन करण्यात आले.
भारतीय संविधान निर्माते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा जयघोष करीत ॲड.इंद्रजीत शिंदे यांनी संविधानाचे महत्व सांगितले. यावेळी अब्दुल लतिफ, गणेश वाघमारे,संजय गजधने, बाबासाहेब गुळीग, प्रदिप पांढरे, श्रीकांत गायकवाड, बालाजी कसपटे, सोहन बनसोडे, माळी मामा, प्रज्ञावंत ओव्हाळ, विलास चव्हाण सह अन्य इतर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन अब्दुल लतिफ यांनी केले. तर आभार बाबासाहेब गुळीग यांनी मानले.