धाराशिव (प्रतिनिधी)- तालुक्यातील आंबेवाडी येथील प्राध्यापक बाबासाहेब इंगळे यांनी भौतिकशास्त्र विषयात एचडी पदवी प्राप्त केले आहे प्राध्यापक इंगळे यांनी “ सिंथेसिस अँड इन्वेस्टीगेशन ऑफ एन आय सी यु झेड हाय इनिशियल परमियाबिलिटी“ या विषयावर प्रबंध सादर केला होता. प्रा.इंगळे यांनी सोलापूर विद्यापीठातील प्रा. डॉ.एस.एस. सुरवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली ही पूर्ण केली. त्यांना सहाय्यक मार्गदर्शक प्रा. डॉ.आर.बी.सुरवंशी यांनी मार्गदर्शन केले. उस्मानिया विद्यापीठ हैदराबाद येथील प्रा. डॉ. के मधुकर यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. त्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे सचिव डॉ. अफसर शेख,संस्थाध्यक्ष संजय कुलकर्णी, प्राचार्य डॉ. एस.यू.मासुमदार यांच्यासह प्राध्यापक, कर्मचारीवृंद, आंबेवाडी ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले आहे.