भूम (प्रतिनिधी)- आरोग्य दूत डॉ.राहुल घुले यांनी त्यांनी चालू केलेल्या भूम, परंडा, वाशी या तीनही तालुक्यामध्ये चालू केलेल्या समाजकार्याची एक वर्षपूर्ती झाल्याच्या निमित्त तीनही तालुक्यांमध्ये ग्रामीण भागात ग्रामदेवता दर्शन यात्रा व लोकसंवाद साधण्यासाठी जाणार असल्याचे भूम येथील शासकीय विश्रामगृह येथे पत्रकार परिषद घेत सांगितले. 

मागच्या वर्षी सुसज्ज असे हॉस्पिटल उभे करण्याचा शब्द दिलेला होता तो आता पूर्ण करत आहोत. जनता बँकेच्या खालच्या तळमधल्यात 25 बेडचे सुसज्ज असे हॉस्पिटल येत्या ऑगस्ट महिन्यापर्यंत पूर्ण होत आहे. या हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन थेटर, व्हेंटिलेटर सहित आयसीयू' सर्व बेडला ऑक्सिजन, एक्स-रे मशीन, सोनोग्राफी मशीन, इसीजी, कार्डियाक ॲम्बुलन्स सुविधा व इतर सर्व सुविधा या हॉस्पिटलमध्ये असणार आहेत. या हॉस्पिटलमध्ये सर्व प्रकारचे ऑपरेशन होणार आहेत. 24 तास लॅब मेडिकल इतर सुविधा आपण देणारा आहोत. या हॉस्पिटलमध्ये ना नफा ना तोटा या तत्त्वावर चार्जेस आकारले जाणार आहेत. 50 टक्के पर्यंत खर्चावर नागरिकांना सेवा देणार आहोत. जनतेला सेवा मिळण्यासाठी या हॉस्पिटलची उभारणी करत आहोत. वेगळ्या वेगळ्या वारी सर्व प्रकारचे ऑपरेशन हॉस्पिटलमध्ये एमबीबीएस एमडी डॉक्टरांकडून ऑपरेशन होणार आहेत. या भागातील आम्ही 400 ते 500 नागरिकांचे मोफत ऑपरेशन केलेले आहेत. व ज्येष्ठ नागरिकांना 25000 काठी वाटप करण्याचा निर्धार असून आत्तापर्यंत आठ हजार काठी वाटप करण्यात आले आहे .व शेतकऱ्यांना डीपी वाहतुकीसाठी अडचण होत होती त्यासाठी आतापर्यंत अडीच हजार शेतकऱ्यांच्या डीपी वाहतूक करण्यात आलेले आहे . ज्या गोरगरीब लोकांना मोफत ऑपरेशन करायचे आहे. तेही सेवा चालूच राहणार आहे. असे यावेळी आरोग्यत दूत डॉ. राहुल घुले यांनी सांगितले.

 
Top