कळंब (प्रतिनिधी)- बांगला देशामध्ये  पंतप्रधान शेख हसीना यांच्या विरोधात उठाव झाला असून यामुळे शेख हसीना यांना देश सोडावा लागला आहे या उठावानंतर बांगलादेशामध्ये मोठ्या प्रमाणात हिंसाचार उसळला असून यामध्ये हिंदू समाजातील नागरिकावर हल्ले होत असून मालमत्तेचे नुकसान  केली जात आहे यामुळे   जीविताला धोका निर्माण झाला असून हिंदू असुरक्षित आहेत हिंदू समाजातील नागरिकावर होणारे हल्ले थांबले पाहिजेत या हल्ल्याच्या निषेधार्थ कळंब येथील सकल हिंदू समाज यांच्या वतीने दिनांक 17 ऑगस्ट रोजी संपूर्ण कळंब शहर बंदची हाक दिली होती  याला 100 % प्रतिसाद मिळाला शहरातील व्यापारी,  किरकोळ विक्रेते, हातगाडे , यांनी आपली दुकाने बंद ठेवली तसेच शाळा महाविद्यालय शंभर टक्के बंद होती, सकाळ हिंदू समाज कार्यकर्त्यांनी सकाळी मोटार सायकल रॅली द्वारे शहरात फिरून बंदचे आवाहन केले व बांगलादेशातील हिंदू समाजावर होत असलेल्या हल्ल्याचा निषेध केला दरम्यान दिनांक 16 ऑगस्ट रोजी कळंब पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रवी सानप यांनी शांतता समिती सदस्य सामाजिक कार्यकर्त्यांची बैठक घेऊन शहरात सामाजिक सलोखा राखावा असे आवाहन केले   बंदला शंभर टक्के प्रतिसाद मिळाला

 
Top