परंडा (प्रतिनिधी) - परंडा शहरातील विविध उपक्रम राबविणारी एकमेव आधार सामाजिक संस्था जी महिलांना आधार, महिला गृह उद्योगाच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करुन देणे, संस्थेच्या वतीने अनाथ विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य पुरविणे, महिलांच्या आरोग्यासाठी आरोग्य शिबीरे घेणे, तसेच निराधार वृद्ध आजी-आजोबांसाठी आपला आधार वृद्धाश्रम चालविणे आदी समाजकार्यासाठी ऑल जर्नालिस्ट अँड फ्रेंड्स सर्कल रत्नागिरी या देशव्यापी पत्रकार मित्र संघटने तर्फे आधार सामाजिक संस्थेला दलितमित्र रमाकांत आर्ते सामाजिक कार्य पुरस्कार मिळाला. जेष्ठ पत्रकार कमलाकर कुलकर्णी, केंद्रीय अध्यक्ष गणेश कोळी, संस्थापक अध्यक्ष यासिन पटेल,ज ेष्ठ पत्रकार व साहित्यिक तु.दा.गंगावणे यांच्या हस्ते संस्थेचे अध्यक्ष झुल्फीकार काझी व कार्यकर्त्या उर्मिला गरड यांनी पुरस्कार स्विकारला.