धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव जिल्ह्यातील कार्यकर्त्यांना व पदाधिकाऱ्यांना बळ द्यावे या मागणीसाठी जिल्हाध्यक्ष महेंद्र  धुरगुडे व धाराशिव जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी यांनी मुंबई येथील प्रदेश कार्यालयास आज (दि.07)  राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हा धाराशिव पक्षाच्या शिष्टमंडळाने भेट घेतली.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हा धाराशिव पक्षाचेचे जिल्हाध्यक्ष,तालुकाध्यक्ष, शहराध्यक्ष, प्रमुख नेते पदाधिकारी कार्यकर्ते यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी धाराशिव चे जिल्हाध्यक्ष महेंद्र धुरगुडे यांच्या नेतृत्वाखाली प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हा धाराशिव पक्षाच्या शिष्टमंडळाने भेट दिली.

जिल्हाध्यक्ष महेंद्र धुरगुडे यांनी धाराशिव जिल्ह्यामध्ये पक्षाची आजपर्यंत झालेली वाटचाल याविषयी सांगितले.  जिल्ह्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते यांना पक्षाच्यावतीने बळ द्यावे असे यावेळी भेटीदरम्यान जिल्हाध्यक्ष व उपस्थित पदाधिकारी यांनी सांगितले. जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला पोषक वातावरण असून यासाठी प्रमुख नेते यांनी याकडे लक्ष देऊन आणखीन यात वाढ कशी होईल याकडे लक्ष देऊन मार्गदर्शन करावे,असे सर्वांच्या वतीने सांगण्यात आले.

तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस व विधान परिषद सदस्य मा.आ शिवाजीराव गर्जे यांची नुकतीच विधान परिषद सदस्य म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल धाराशिव जिल्ह्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.

जिल्हाध्यक्ष महेंद्र काका धुरगुडे यांनी जुलै 2023 रोजी पदभार स्वीकारल्यापासून ते आज पर्यंतचा आपला जिल्हाध्यक्ष पदाचा कार्य अहवाल प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांच्याकडे सादर केला.

 जिल्हाध्यक्ष महेंद्र  धूरगुडे यांच्यासोबत प्रदेश उपाध्यक्ष सुरेश बिराजदार,प्रदेश सरचिटणीस सुरेश पाटील, प्रदेश सचिव गोकुळ शिंदे, पदवीधर प्रदेश कार्याध्यक्ष नितीन बागल, अल्पसंख्यांक प्रदेश उपाध्यक्ष शफी भाई शेख, जिल्हा कार्याध्यक्ष समियोद्दिन मशायक, भूम परंडा वाशी विधानसभा अध्यक्ष नवनाथ आप्पा जगताप, धाराशिव कळंब विधानसभा अध्यक्ष मोहन मुंडे,परंडा विधानसभा कार्याध्यक्ष किरण पाटील,तुळजापूर तालुकाध्यक्ष श्रीकृष्ण सूर्यवंशी, कळंब तालुका अध्यक्ष शिवाजीराव लकडे, वाशी तालुकाध्यक्ष ॲड.सूर्यकांत सांडसे, भूम तालुकाध्यक्ष ॲड.रामराजे साळुंखे, परंडा तालुकाध्यक्ष अमोल काळे, धाराशिव शहराध्यक्ष सचिन तावडे, लोहारा शहराध्यक्ष शेख आयुब, भूम शहराध्यक्ष जीवन गाढवे, अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष असद खान पठाण, माजी सैनिक विभाग जिल्हाध्यक्ष मच्छिंद्र क्षीरसागर,सेवादल सेल जिल्हाध्यक्ष सतीश घोडेराव, सामाजिक न्याय विभाग जिल्हाध्यक्ष अतुल जगताप,आदिवासी सेल जिल्हाध्यक्ष नानासाहेब पवार, किसान सेल जिल्हा अध्यक्ष प्रकाश बावणे,महिला जिल्हा कार्याध्यक्षा अप्सरा पठाण,तुळजापूर सा.न्याय विभाग तालुकाध्यक्ष विनोद जाधव, तुळजापूर विद्यार्थी तालुकाध्यक्ष सोहेल बागवान,ओबीसी सेल भूम तालुकाध्यक्ष अभिजीत वनवे, धाराशिव महिला तालुका उपाध्यक्ष उषा लगाडे,वाशी नगरसेवक  भागवत कवडे, 

बा.क.स अध्यक्ष ॲड.आशा शेरखाने (कटके), बा.क.स सदस्य ॲड. प्रदीप शिंदे, ॲड. वर्षा वाघचौरे, ॲड. गजानन सूर्यवंशी, ॲड. विजय देशमुख, बालन्याय मंडळ सदस्य ॲड. अनिता शिऊरकर मॅडम, बालन्याय मंडळ सदस्य ॲड. नासिर शहा, जि.म.बा मा.सुवर्णा जाधव मॅडम, सैनिकी सेवा पूर्व प्रशिक्षण संस्था अधीक्षक जगताप सर,शेख जमीर, सादिक मुजावर,मोसिन मिर्झा, काशिनाथ सुरवसे, विजय वडागळे, चंद्रकांत सकट, लडू भाऊ लोंढे, शेख जमील, शेख सादिक, मोहसीन मिर्झा, रफिक पठाण आदी धाराशिव जिल्ह्यातील पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व सहकारी उपस्थित होते.

 
Top