धाराशिव (प्रतिनिधी)-तालुकास्तरीय शालेय योगासन क्रीडा स्पर्धा दिनांक 7/8/2024 रोजी श्री श्री गुरुकुल आणदुर येथे पार पडल्या या स्पर्धेमध्ये आपल्या एकलव्य विद्या संकुलातील विद्यार्थ्यांनी अतिशय उत्तम कामगिरी करून यश संपादन केले .त्यामध्ये 14 वर्ष वयोगट मुले/ मुली मध्ये विजया पवार - द्वितीय क्रमांक , प्रियंका देवकते - तृतीय क्रमांक , जानवी क्षीरसागर - चौथा क्रमांक , आकाश दूधभाते - प्रथम क्रमांक 17 वर्ष वयोगट मुले/ मुली मध्ये सोनाक्षी पवार - द्वितीय क्रमांक, आरती मेंडके - पाचवा क्रमांक , ज्ञानेश्वर काळे - द्वितीय क्रमांक , महेश राठोड - तृतीय क्रमांक , ज्योतीराम पवार - पाचवा क्रमांक रिदमिक योगा मध्ये अजित पाखरे - प्रथम क्रमांक , प्राची पाटोळे - प्रथम क्रमांक व आर्टिस्टिक योगा मध्ये ज्योतीराम पवार - प्रथम क्रमांक , जानवी क्षिरसागर - प्रथम क्रमांक मिळाऊन यश संपादन केले.
यांनी योगासन मध्ये चांगली कामगिरी केली व त्यांची पुढे होणाऱ्या जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी यांची निवड झाली आहे. या सर्व खेळाडूंचे व क्रीडा विभाग प्रमुख व क्रीडा प्रशिक्षक ज्ञानेश्वर भुतेकर , योगा प्रशिक्षक प्रणिता ताई, बालाजी क्षीरसागर, सुजाता दीदी यांचे संस्थेच्या वतीने संस्थेचे अध्यक्ष रामचंद्र वैदू, कार्यवाह, विवेक आयचीत, उपाध्यक्ष डॉ.अभय शहापूरकर, मुख्याध्यापक अण्णासाहेब कोल्हटकर,विठ्ठल म्हेत्रे,संस्थेचे संचालक मंडळ व क्रीडा समितीचे सर्व सदस्य व सर्व कर्मचारी यांनी अभिनंदन केले व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.