धाराशिव (प्रतिनिधी)- बँकेने कारखाना विक्री करू नये, या मागणीसाठी तेरणा बचाव संघर्ष समितीच्या वतीने बुधवारी जिल्हा बँकेसमोर आंदोलन केले. बँकेचा जर कारखाना विक्रीचा डाव असेल तर तो हाणून पाडला जाईल, असा इशाराही यावेळी आंदोलनकर्त्यांनी दिला.
कारखान्याकडे असलेली थकहमीसाठी बँकेने 25 वर्षासाठी कारखाना भाडेतत्वावर देण्यात आलेला आहे. बँकेचा परवाना वाचविण्यासाठी कारखाना विक्रीचा डाव बँकेचा असल्याचे सांगत बुधवारी तेरणा बचाव संघर्ष समितीच्यावतीने जिल्हा बँकेसमोर आंदोलन करण्यात आले. यावेळी संग्राम देशमुख, अमोल समुद्रे, निहाल काझी, राहुल वाकुरे यांच्यासह सभासद उपस्थित होते.