तुळजापूर (प्रतिनिधी) - तुळजापूर नगर परीषद गाळे धारकांकडून पावेतो भाडे स्वरूपात दर महा पैसे वसूल करीत आहे. त्यामुळे नगर पालिकेची फसवणूक होऊन आर्थिक नुकसान होत आहे. तरी यात गुंतलेल्या संबंधितांवर फसवणूक व होत असलेल्या आर्थिक अपहार संबंधी लवकरात लवकर आवश्यक ती कारवाई करण्यासंबंधी मुख्याधिकारी, जिल्हाधिकारी धाराशिव यांनी सुचित करावे. अशी मागणी विशाल रोचकरी यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे. या बाबतीत जिल्हाधिकारीं कार्यालय काय निर्णय घेतात याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.
तिर्थक्षेञ तुळजापूर शहरात मोक्याच्या सोन्याची अंडी देणाऱ्या नगरपरीषद जागेवर तीन मजली असे श़ाँपींग काँम्पेलेक्स बांधले आहे. यात चाळीस आसपास दुकाने आहेत. येथे लाँजेस सह विविध व्यवसाय चालु आहेत. या व्यवसायीकांना लाईट सह विविध परवाने कसे मिळाले असा सवाल शहरवासियांमधुन केला जात आहे.
तुळजापूर न.प. मालकी भूखंडावर एका फर्म कंपनीने शासनाच्या पूर्व परवानगी शिवाय बनावट कागदपत्रा आधारे व नगर रचनाकार यांनी मंजूर केलेल्या रेखानकाशा नुसार बांधकाम न करता तसेच करारनाम्यातील अटी व शर्तीचा भंग केल्याने महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम 1966 चे कलम 52 व 53 नुसार अतितातडीने आवश्यक ती कारवाई करण्याची मागणी केली आहे.