कळंब (प्रतिनिधी)- वृंदावन फाउंडेशन पुणे व संत ज्ञानेश्वर महाराज बालकाश्रम कळंब यांच्या वतीने तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाथर्डी येथे चित्रकला किट व शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
प्रथम क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.कार्यक्रमाचे अध्यक्ष हभप. महादेव महाराज आडसुळ व प्रमुख पाहुणे माजी नगरसेवक सतिश टोणगे, प्राचार्य सतिश मातने, स्व.गणपतराव कथले आघाडीचे अध्यक्ष बाळासाहेब कथले, चेतन कात्रे, कळंब तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष विलास मुळीक, संदिप कोकाटे, हभप. विलास पिंगळे महाराज, समाजसेवक बंडु ताटे, यश सुराणा, सरपंच नानासाहेब पिंगळे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा अंजली जाधव, पोलिस पाटील बालाजी चिंचकर, पंडित देशमुख, मयुर पिंगळे, मनोज पिंगळे उपस्थित होते. या प्रसंगी प्राचार्य सतिश मातने यांनी विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रात भाग घेऊन आपल व आपल्या कुटुंबाचा नाव लौकीक करावा असे आवाहन केले. हभप महादेव महाराज आडसुळ यांनी भारताची संस्कृती व शिक्षण तसेच आईवडील हेच पहिले गुरू आहेत या बाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व प्रास्ताविक मुख्याध्यापक राजेंद्र बिक्कड व आभारप्रदर्शन शिक्षक धनंजय गव्हाणे यांनी केले.कार्यक्रमासाठी सहशिक्षिका मनिषा पवार, सरोजिनी पोते, सुरेखा भावले यांनी परिश्रम घेतले.