तुळजापुर (प्रतिनिधी)- तालुका विधानसभा मतदार संघातील शहापूर गट काँग्रेस कार्यकर्ता मेळावा मौजे इटकळ येथील एकता मंगल कार्यालय येथे सोमवार दि.19 ऑगस्ट 2024 रोजी सायंकाळी मोठया उत्साहात संपन्न झाला. माजी मंत्री मधुकररावजी चव्हाण यांच्या प्रमूख मार्गदर्शनाखाली व माजी नगराध्यक्ष शहबाज काझी, पंचायत समितीचे माजी सभापती शिवाजीराव गायकवाड, युवा नेते ऋषी मगर, युवा नेते महंमद इनामदार, मेजर भालचंद्र कोळी, शेकुंबर मुजावर यांच्या प्रमूख उपस्थितीत हा काँग्रेस कार्यकर्ता मेळावा घेण्यात आला. 

कार्यक्रमाच्या सुरुवातीस मान्यवरांच्या हस्ते दीप्रज्वलन व प्रतीमा पूजन करण्यात आले त्यानंतर उपस्थित मान्यवरांचा शहापूर गटातील काँग्रेस कार्यकर्त्यांच्या वतीने सन्मान करण्यात आला. प्रास्ताविक हभप. शिवाजी चव्हाण यांनी करतांना मधुकररावजी चव्हाण यांनी तालुक्यातील केलेल्या विकासात्मक कामाची सविस्तर माहीती दिली. त्यानंतर सामाजिक कार्यकर्ते विनायक जाधव, दयानंद गायकवाड, अरुण दळवे, बशीर पटेल, युवा नेते ऋषी मगर, माजी सभापती शिवाजीराव गायकवाड, व नळदुर्ग नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष शहबाज काझी यांनी मनोगत व्यक्त करतांना तुळजापुर तालुक्याचे विकासरत्न माजी मंत्री मधुकररावजी चव्हाण यांच्या कामाचे कौतुक करीत आगामी येणाऱ्या तुळजापुर विधानसभा निवडणुकीत मधुकरराव चव्हाण यांना विक्रमी मतांनी विजयी करण्याचा संकल्प केला. त्यानंतर कार्यक्रमांचे प्रमूख मार्गदर्शन माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना आज वर केलेल्या कामाचा आढावा सांगत भविष्यात सर्व सामान्यांसाठी करावयाची कामे सांगत आगामी तुळजापुर विधानसभा निवडणुक कार्यकर्त्याच्या बळावर पूर्ण ताकदीनिशी लढवणार असल्याचे सांगीतले. त्यावेळी उपस्थित काँग्रेस कार्यकर्त्यांनी जल्लोष करीत आनंद साजरा केला. या शहापूर गट काँग्रेस कार्यकर्ता मेळाव्यास इटकळ, केशेगाव, बाभळगाव , निलेगाव, आरबळी, हिप्परगा ताड , येवती, शिरगापुर, उमरगा चि., धनगरवाडी , चव्हाणवाडी , गुळहळी, टेलरनगर, दिंडेगाव, सराटी, जय हनुमान नगर तांडा केशेगाव आदि गावातून बहुसंख्य कार्यकर्ते आजी माजी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य मोठया संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमांचे सूत्रसंचलन दिनेश सलगरे यांनी केले तर आभार अझर मुजावर यांनी मानले. हा काँग्रेस कार्यकर्ता मेळावा व्यवस्थित पार पाडण्यासाठी कार्यक्रमांचे आयोजन अझर मुजावर, लियाकत खुदादे, अरुण दळवे, विकास पाटील, हारून शेख, अफसर शेख, दयानंद गायकवाड, शिवाजी महाराज चव्हाण, तुकाराम गायकवाड यांनी परिश्रम घेतले.

 
Top